9 योग याग विधी येणें नोहे सिद्धि । वायांचि उपाधि दंभधर्म ॥ हरिपाठ


योग याग विधी येणें नोहे सिद्धि ।
वायांचि उपाधि दंभधर्म ॥१॥
भावेंवीण देव न कळे निःसंदेह ।
गुरुवीण अनुभव कैसा कळे ॥२॥
तपेवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त ।
गुजेवीण हित कोण सांगे ॥३॥
ज्ञानदेव मार्ग दृष्टांताची मात ।
साधूचे संगती तरुणोपाय ॥४॥

Comments

Popular posts from this blog